नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंग प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला आहे. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलातना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न केला असता त्यांनी परत एकदा रिया चक्रवर्तीची लायकी नाही असा उल्लेख केला.
#WATCH "Bihar ke mukhyamantri pe comment karne ki aukaat Rhea Chakraborty ki nahi hai," says Bihar DGP when asked about the actor's comments on CM Nitish Kumar. #SushantSinghRajput pic.twitter.com/qDPKkHINhE
— ANI (@ANI) August 19, 2020
बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलण्याची रिया चक्रवर्तीची ‘औकात’ नाही असे गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे. तसेच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले. यासोबतच न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण प्रचंड आनंदी असल्याचं सांगत हा १३० कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“आता लोकांना सुशांत सिंह प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे. ही संपूर्ण देशासाठी मोठी बातमी आहे. आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवलं तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आलं. यावरुन लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं. आम्ही जे काही काम केलं ते कायदेशीर पद्धतीने केलं. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे” असेही त्यांनी म्हटले आहे.
#WATCH Bihar DGP says, "I'm very happy. SC order has strengthened trust people have in the Court & has assured the nation that justice will be delivered…Today's verdict has proved that Bihar Police was correct. The way Mumbai Police behaved was illegal." #SushantSinghRajput pic.twitter.com/Odq9TXTiGK
— ANI (@ANI) August 19, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.