HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचे अर्थसंकलपीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई | राच्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी किती असेल याबाबत शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु सध्या १ मार्च ते ८ मार्च या पहिल्या आठवड्याचं कामकाज ठरवण्यात आलं असून गुरूवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर पुन्हा निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, ८ मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

यापूर्वी ठरलेला तीन आठवड्यांचा कार्यक्रम आजच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. अधिवेशनाचे कामकाज कसे चालेल यावरदेखील चर्चा करण्यात आली. २५ तारखेला पुन्हा बैठक होईल आणि त्यानंतर पुढील बैठक घेण्यात येणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यपालांनी जशी अर्थसंकल्पीय अधिवशनाबाबत काळजी दाखवली तशी त्यांनी विधानसभेच्या १२ रिक्त जागांबाबतही दाखवावी. अधिवेशनापूर्वी त्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या ६५० कोटीच्या निधीस मंजुरी – अजित पवार

Aprna

जळगाव महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देणार?

News Desk

विनोद तावडेंनी केले डॉ. अरुणा ढेरे यांचे अभिनंदन

swarit