HW News Marathi
Covid-19

हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी गंगा नदी काठी केली तोबा गर्दी

हरिद्वार | देशातील वाढती कोरोना रुग्ण संख्या धमकी भरवणारी आहे. अशा वातावरणात धार्मिक, राजकीय अशा कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी करणे म्हणजे धोक्याची घंटी आहे. असं असतानाही जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी काल (११ एप्रिल) मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली होती. एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे यावेळी लोकांकडून करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आलं आहे. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन यावेळी करण्यात आलं नाही.

गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी यावेळी हरिद्वारला येताना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं सरकारने अनिवार्य केलं असल्याने कोरोना हा येथे चिंतेचा विषय नसल्याचा दावा केला आहे.

१२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या कोरोनाच्या संकटात पार पडत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून गेल्या २४ तासांत तब्बल दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कुंभमेळ्यासाठी सर्व नियमांचं पालन केलं जात असलं तरी तज्ञांनी गर्दी करु नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अनेक भक्तांनी याठिकाणी गाईडलाइन्सचं पालन करणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा युजीसीच्या सूचनेनंतरच निर्णय, उदय सामंत यांची माहिती

News Desk

देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज

News Desk

शरद पवारांनी घेतला सातारा, कोल्हापूरमधील कोरोनास्थितीचा आढावा

News Desk