HW News Marathi
Covid-19

पुण्याला पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर निघाले खराब, डीनची थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार

पुणे | राज्यातील रुग्णसंख्या वाढ प्रशासनाची चित्ता वाढवणारी आहे. अशात पुन्हा एकदा रुग्णालयात ऑक्सिजन, बेड, व्हेटिंलेरची कमतरता भासण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये रुग्ण वाढत असताना पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याला पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे कालच्या (१० एप्रिल) आढावा बैठकीत तक्रार केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारकडूनच ससूनला व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र, हे व्हेंटिलेटर बंद पडत असल्याने ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवरून, लसीवरुन सध्या राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद सुरु असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली असून आता त्यावरूनही एक नवा वाद चांगला पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्र सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे. काल (१० एप्रिल) एक पत्रक ट्विट करत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ‘महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत,’ असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामगारांमध्ये भेदभाव नको, नियमित सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या

News Desk

कोरोनावर ४ लसींचे लवकरच क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार

News Desk

कोरोनाची लस कोण घेऊ शकणार आणि कोण नाही? आरोग्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

News Desk