HW News Marathi
देश / विदेश

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

नवी दिल्ली | निवडणूक आयुक्त अशोक लावला यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, ते आशियाई विकास बॅंकेत उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आशियाई विकास बॅंकेत दिवाकर गुप्ता यांची ते जागा घेतील. दरम्यान, बिहार निवडणूकांपूर्वी निवडणूक पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे.

जानेवारी २०१८ मध्ये लवासा यांनी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे लवासा हे दुसरे आयुक्त ठरले आहेत. अशोक लवासा यांच्यापूर्वी १९७३ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त नागेंद्र सिंग यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. दरम्यान, अशोक लवासा यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना एप्रिल २०२१ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती मिळाली असती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हर बॅटलमें अटल’ अमूल कडून वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk

शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने सुनेला मारहाण

News Desk

ठरलं! यूएईत होणार IPL २०२१चे उर्वरित सामने

News Desk