HW News Marathi
Covid-19

“कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालो”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केली आहे. किरीय सोमय्या यांनी स्वत: ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. “कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय”, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती दिली आहे.

“मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये गेल्या १० दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे. डॉ. राहुल पंडीत आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या उपचारानंतर मी आणि माझी पत्नी मेधा घरी आलो आहोत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय”, असे किरीट सोमय्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती १० ऑगस्टला समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन त्याची माहिती दिली होती. “मी आणि माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते. आणि आता यशस्वीरित्या कोरोनावर मात करुन सोमय्या पत्नीसह घरी आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….नाहीतर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्यांना कडक सूचना

News Desk

जगात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७० लाखांच्या पुढे

News Desk

कर्नाटकने महाराष्ट्राला टाकलं मागे, महाराष्ट्राने रोजची रुग्णसंख्या आणि मृतांच्या यादीत गाठला उच्चांक

News Desk