HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूर निवडणूकीत मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा, भगीरथ भालकेंचा करणार प्रचार

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी प्रतिष्ठेचा विषय असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. एकीकडे बाजू आणि राष्ट्रवादी जोरदार तयारीला लागले असताना आता मनसेने या निवडणूकीत उडी घेतली आहे. मनसेने राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंना पाठिंबा देण्याचं निश्चित केले असून ते त्यांचा प्रचारही करणार आहेत. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. कोरोनामुळे राज्यावर लॉकडाऊनचे ढग दाटले असतानाही पंढरपुरात सभा घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपूरात सभा घेतल्या होत्या.

दरम्यान, या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भाजपला एकामागून एक धक्का बसतच आहेत. आधी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना घरातूनच विरोध करत त्यांचे चुलतभाऊ या निवडणूकीत उतरले होते. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ८ एप्रिलला पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रचारसभा झाली होती. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचारसभेत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

“मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला”

“विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे. भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार. पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार” असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदूंच्या राज्यात गणरायावरही अत्याचार?

News Desk

कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात येणार ?

News Desk

राज्यातील ५ मृत्यू डेल्टा प्लसमुळे झाले नाहीत, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

News Desk