HW News Marathi
Covid-19

“लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय ??”

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून विकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र, तरीही दररोज वाढणारा कोरोनाधितांचा आकडा सातत्याने नवे उच्चांक गाठत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाकरे सरकार सध्या लॉकडाऊनच्या विचारात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१० एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याबाबत आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी लॉकडाऊनबाबत एक सूचक ट्विट केले आहे.

पंकजा मुंडे आपल्या ट्विटमध्ये असे म्हणतात कि, “लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची, अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे?? कोरोनाची साखळी कशी तोडणार??मजुर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे.आरोग्य यंत्रणा वरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.” त्यामुळे, एकीकडे भाजप लॉकडाऊनच्या तीव्र विरोधात असताना कुठेतरी भाजप नेत्या पंकजा मुंडे लॉकडाऊनचे समर्थन करत आहेत असे या ट्विटमध्ये दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे :

* कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.

* आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे.

* विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सुचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल.

* आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोप्पे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.

एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने दोन आधीच महिने कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय .

* कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.

* सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे.

* रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल.

* कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो.

* आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत.

* एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल.

* मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे.

* सर्वपक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राला लसीचा तुटवडा माहित असूनही लसीकरणाची घोषणा करून टाकली, सीरमचा मोठा दावा

News Desk

‘मुंबई मॉडेल’ पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत, राष्ट्रवादीची टीका

News Desk

देशात एका दिवसात तब्बल ६,०८८ सर्वाधिक संख्या कोरोना रुग्णांची नोंद

News Desk