नवी दिल्ली | पीएम केअर फंडमध्ये जमा केलेले पैसे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( NDRF) मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत. या संदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (१८ ऑगस्ट) फेटाळून लावली आहे. कोरोनासाथी विरुध्द लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पीएम केअर फंड ट्रस्टची स्थापना केली गेली आहे.
पीएम केअर फंड बद्दल सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वंयसेवी संस्थेने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून पीएम केअर फंड तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्तीच्या व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही व्यक्ती व संस्थेद्वारा करण्यात आलेली मदत एनडीआरएफकडे हस्तांतरित करायला पाहिजे,” असे सांगत संस्थेने पीएम केअर फंडातील निधी एनडीआरएफकडे हस्तांतरित करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएम केअर फंडासंदर्भात दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, “पीएम केअर फंडातील निधी राष्ट्रीय आपत्ती मदत निधीमध्ये जमा अथवा हस्तांतरित करता येणार नाही,” असे सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.