बिजनौर | उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा देशवासीयांनी निवडून दिले. मात्र, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी वारंवार रोजगार, शेतकऱ्यांच्या मुद्दे उपस्थित केले. परंतु, त्यांच्या राज्यात यासंदर्भात काहीच होताना दिसत नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला आहे.
उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असून, त्या ठिकठिकाणी किसान महापंचायतीत सहभागी होऊन मोर्चा सांभाळत असल्याचे दिसत आहे. बिजनौर येथील महापंचायतमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, सन २०१७ पासून उसाचा दर वाढवण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांची देणी मोदी सरकारने दिली नाहीत. मोदी सरकार १६ हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.
कृषी कायदे उद्योगपतींसाठी उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी केंद्रीय कृषी कायदे तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे पीक घ्यायचे की नाही, हे आता उद्योगपती ठरवणार आहेत. उद्योगपतींचे भले करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायला मोदी सरकारकडे वेळ नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.
Sometimes I think why people chose Modi ji twice. They might've done it as they had hopes & trust that he would work for them. A lot was said during 1st election. He spoke of farmers, unemployment & others in the 2nd. But what happened? Nothing: Priyanka GV, Congress in Bijnor pic.twitter.com/m4oSjROQFH
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 15, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.