HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गमावली अत्यंत जिवलग व्यक्ती 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका अत्यंत निकटवर्तीयाचे निधन झाले आहे. अजित पवार यांचे काटेवाडी येथील अत्यंत विश्वासू कर्मचारी, शेती व मुकादम जालिंदर शेंडगे यांचे बुधवारी (७ एप्रिल) निधन झाले. जालिंदर यांच्यावर बारामतीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. एका कार्यक्रमात व्यस्त असताना अजित पवार यांना जालिंदर यांच्या खालावलेल्या प्रकृतीविषयी निरोप देण्यात आला होता. त्यावेळी अजित पवारांनी फोनाफोनी करत संबंधित डॉक्टरांना सूचनाही केल्या होत्या. “काहीही करा पण जालिंदरला बरं करा”, अशी विनंती अजित पवारांनी केली होती.

अजित पवार हे त्यानंतर वारंवार जालिंदर यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन होते. जालिंदर दवाखान्यात जात नाहीत तोपर्यंत अजित पवार स्वत: याबाबत पाठपुरावा करत होते. अजित पवारांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहिली होती. मात्र, बुधवारी अजित पवार यांच्या अत्यंत जिवलग व्यक्तीचे निधन झाले. जालिंदर शेंडगे हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासु कर्मचारी होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला ! भगिरथ भालकेंना मिळाली उमेदवारी ..

News Desk

अमित राज ठाकरे तातडीने नाशकात, राज ठाकरे मोठी जबाबदारी देणार?

News Desk

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

News Desk