HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची नियमानुसार कारवाई होणार – अनिल देशमुख

नागपूर | बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येने राजकीय वातावरण हादरले आहे. या प्रतकणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव येत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता गृहमंत्री अनिस देशमुख यांनी भाष्य केले आहे. पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अनिल देशमुख यांनी आठ दिवसानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी राठोडा यांचा राजीनामा घेऊन नंतरच त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधक करत आहेत, असं देशमुख यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिल्यानंतर या मृत्यूचं गूढ उकलणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद

swarit

विवा महाविद्यालयाची जागा आता कोरोनाच्या उपचारासाठी उपलब्ध

swarit

राहुल गांधींच्या सभेला दोन्ही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची अनुपस्थिती

News Desk