HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचा विषय नाही, मी भाजपशी प्रामाणिक –  संजय काका पाटील  

सांगली | भाजप खासदार संजय काका पाटील यांना सांगलीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जवळ बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको नको म्हणत असताना, जयंत पाटलांनी त्यांना जवळ बसवून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चा रंगली. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’ कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.

राष्ट्रवादीशी जवळीक नाही, पण गट-तट, पक्ष हा मुद्दा बाजूला ठेवून चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो, असं सूचक पण बचावात्मक वक्तव्य भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केलं. मी भाजपतून बाहेर जावं, असं कोणी म्हणत असेल, तर त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असंही संजयकाका म्हणाले. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवल्याने चर्चेला पुन्हा तोंड फुटलं होतं.

“मी भाजपशी प्रामाणिक” – संजयकाका पाटील

“राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचा विषय नाही, गट तट पक्ष हा मुद्दा थोडा बाजूला ठेवून जिल्ह्यातील चांगल्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. मी भाजपशी प्रामाणिक आहे. मात्र कोणी जर मी भाजपमधून बाहेर जावं, असं म्हणत असतील, तर मी त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असंही संजयकाका म्हणाले. वारंवार जयंत पाटील आणि संजयकाका पाटील हे एकत्र येत असल्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

भाजपच्या बैठकांना अनुपस्थिती

भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका हे अनुपस्थित राहिले. सांगलीत काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली, त्यावेळीही संजयकाका गैरहजर होते. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका आवर्जून उपस्थित राहिले.

जयंत पाटलांनी शेजारी बसवलं

सांगली जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा अभियान कार्यक्रमाच्या वेळी दोघे एकत्र व्यासपीठावर आले होते. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको म्हणत असताना जयंत पाटलांनी त्यांना शेजारी बसवलं आणि 15 मिनिटं चर्चा रंगली. यापूर्वीही एका बंद खोलीतून दोघे नेते एकत्र बाहेर आले होते.

कोण आहेत संजय काका पाटील?

२०१४ साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आर आर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले आहेत. बेधडक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. संजयकाका पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती. काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून ते विधानपरिषदेचे आमदार झाले होते. पुढे राष्ट्रवादीला राम राम ठोकून त्यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही आयुष्यात कधी नव्हे ते राष्ट्रवादीला मतदान केले, आणि तुम्ही…!

News Desk

महाविकासआघाडीवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या आमदारांची सोनिया गांधींकडे तक्रार

Aprna

“उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Aprna