HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थ पवार १८ वर्षाचा आहे, आणि परिपक्व आहे… नारायण राणेंनी केली पाठराखण !

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं होतं. मात्र, भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. पार्थ १८ वर्षांचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवली आहे. तो परिपक्वच आहे,” अशी भूमिका राणे यांनी मांडली आहे.

नारायण राणे यांनी आज (१६ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासह पार्थ पवार यांच्याबद्दल भाष्य केलं. पार्थ पवार यांच्याबद्दल बोलताना खासदार राणे म्हणाले, “पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. तो राजकारणात आहे. त्याशिवाय त्याने निवडणुकही लढवली आहे. त्यामुळे तो परिपक्वच आहे. पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्याने हे विधान केलं असेल,” असे म्हणत राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

पार्थ पवार अपरिपक्व. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे म्हणत शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात अशी एक वेगळी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली! जयंत पाटलांनी चक्काजाम आंदोलनाची उडवली खिल्ली…

News Desk

भारत भालके यांच्या जण्याने कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले – शरद पवार

News Desk

अमोल काळे, वीरेंद्र तावडे दाभोलकरांच्या हत्येचे सुत्रधार | सीबीआय

swarit