HW News Marathi
महाराष्ट्र

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुणे | निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. पी. बी. सावंत यांचे आज (१५ फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला होता.

पी. बी. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली; त्याच्या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे जून १९८२ मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी. १९८९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेला संपविण्याचा प्रयत्न, नवीन आलेले भाऊ विष कालवत आहेत ! 

News Desk

मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार!

News Desk

आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना झोपेतच सर्पदंश

News Desk