HW News Marathi
महाराष्ट्र

“कोणत्या शहाण्याने मास्क लावण्याचा सिद्धांत?”, काढला संभाजी भिडेंचा सवाल

सांगली | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असं ते म्हणाले.

“मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो मानसिक आजार आहे,” असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. संभाजी भिडे म्हणाले की, “समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दुशासन होता कामा नये, निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. शासनाचे निर्णय घातकी आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही.”

“लॉकडाऊनमध्ये खासदार आणि आमदारांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत, असलं सरकार फेकून दिल पाहिजे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.

“कोरोना हा रोगच नाही. दारु दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठ्या मारतात,” असं भिडे गुरुजी म्हणाले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारही जबाबदार आहे. कोरोनाच्या बाबतीत देशात खेळखंडोबा चालू आहे, जे जगायचे ते जगातील जे मरायचे ते मरतील, असं असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलं. तसंच मिलिट्रीला आपण काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला.

संभाजी भिडेंनी शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता

याआधी संभाजी भिडे यांनी मागील वर्षी कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला. यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळून आले होते.

https://twitter.com/abhiasks/status/1380048682079424513?s=20

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! उद्या दुपारी १ वाजता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल होणार जाहीर

News Desk

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई वडिलांनी दिले स्पष्टीकरण

Manasi Devkar

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार

News Desk