HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

कराड | महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. पाटील हे साताऱ्याचे पालकमंत्री आहेत. बाळासाहेब पाटील हे १९९९ पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. काल मध्यरात्री त्यांचा रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला. कराडच्या कृष्णा रुग्णालयात बाळासाहेब पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या संपर्कात ते आले होते.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीतील जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत. आणि आता राष्ट्रवादीतील हे तिसरीत मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदाची बातमी ! सिरम इन्स्टीट्यूटमधून कोरोना लशीचे कंटेनर रवाना..

News Desk

कोरोना संकट चिंताजनक! पंतप्रधान मोदींनी ११ वाजता बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

News Desk

मोठी घोषणा ! पुण्यात दिवसभर जमावबंदी, तर संध्या ६ ते सकाळी ६ संचारबंदी

News Desk