HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! दोषींवर कारवाई होणार…

मुंबई | पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आणि राज्यातील राजकिय वातावरण तापले. याचे कारण म्हणजे यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येऊ लागले. दरम्यान, या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर लवकर कारवाई केली जावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. तसेच, यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रियाआली आहे.पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगेच्या घटनेबाबत चौकशी समिती; 24 तासांत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

Aprna

चंद्रकांत पाटलांनी साधी ‘टरबूज खरबूज’ सोसायटीही चालवलेली नाही – अजित पवार

News Desk

मुख्यमंत्र्यांनी साधला शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद

News Desk