HW News Marathi
देश / विदेश

भारताने एकदा ठरवलं की भारत ते करुनच दाखवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारत आज झाला आहे त्यासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. आणि कोरोना काळात आपण सगळे एकत्र मिळून कसे लढत आहोत आणि असेच लढू असा विश्वास व्यक्त केला.

वेदात वसुधैवं कुटुंबकम म्हणत होते तर विनोबा जय जगत म्हणत. हे विश्वच भारतासाठी नेहमी घर राहिलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं योगदान वाढवायला हवं. त्यासाठी भारताला स्वतःला सशक्त व्हावं लागेल, आत्मनिर्भर व्हावं लागेल. आपली मुळं मजबूत होतील तेव्हा आपण जगाला देखील मदत करायला पुढे येऊ. आपल्या देशात नैसर्गिक साधनांची कमतरता नाही. त्यामुळे आपल्याला या संसाधनांमध्ये मुल्यवृद्धी करावी लागेल.

देशाच्या तरुणांमधील महिलांमधील क्षमतेवर विश्वास आहे. भारताने एकदा ठरवलं की भारत ते करुनच दाखवतो. त्यामुळेच आपण जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो तेव्हा जगाला भारताकडून अपेक्षा देखील आहेत. आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठी तयारी करायला हवी. युवकांनी भरलेला भारताला आत्मविश्वास कमवावा लागेल.

कच्चा माल पाठवायचा आणि तयार वस्तू आयात करायची, हे किती वर्ष करत राहणार?वयाच्या२५-३०व्या वर्षी आपले कुटुंबीय आत्मनिर्भर व्हायला सांगतात, देश ७५व्या वर्षाच्या दिशेने जात असताना आत्मनिर्भर होणे आवश्यकच आहे.या सर्व संघर्षातही भारताच्या सुपुतांनी स्वातंत्र्याची चळवळ मजबूत ठेवली. अखेर जगभरात भारताच्या या स्वातंत्र्य चळवळीने जगभरात स्वातंत्र्यासाठी एक प्रेरणा तयार केली. जग भारताच्या या योगदानाला कधी विसरु शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फटाके फोडणे आणि मारणे ही भारतीय संस्कृती नाही – प्रकाश जावडेकर

News Desk

आनंदवार्ता ! ‘चांद्रयान- २’ चे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची होणार नियुक्ती

swarit