नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ६४ हजार ५५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता २४ लाख ६१ हजार १९० वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तब्बल १००७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात तब्बल १७ लाख ५१ हजार ५५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आज (१४ ऑगस्ट) ही अधिकृत आकडेवारी जारी केली आहे.
Spike of 64,553 cases and 1007 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally in the country rises to 24,61,191 including 6,61,595 active cases, 17,51,556 discharged/migrated & 48,040 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/WqClKQSJcc
— ANI (@ANI) August 14, 2020
देशभरात आतापर्यंत तब्बल ४८ हजार ४० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सद्यस्थितीत देशात विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची अर्थात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ६१ हजार ५९५ इतकी आहे. तर जगभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा देखील चिंताजनक आहे. जगात आतापर्यंत एकूण २ करोड ८ लाखहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल ७ लाख ४८ हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाची स्थिती नियंत्रणात येण्यासाठी सध्या सर्व स्तरांतून प्रयत्न सुरु आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.