HW News Marathi
Covid-19

कोझिकोड विमान अपघाताच्या चौकशीकरिता ५ सदस्यीय समितीची स्थापना

नवी दिल्ली | केरळमधील कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरुन घसरून भीषण अपघात झाला. हे विमान क्रॅश होताच चक्क विमानाचे दोन तुकडे झाले. दरम्यान, आता एअरक्राफ्ट अपघात अन्वेषण ब्युरोने या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कॅप्टन एस. एस. चाहर यांच्या नेतृत्वात ५ सदस्यांची टीम केरळमधील या भीषण विमान अपघाताची चौकशी करणार आहे. पुढील ५ महिन्यांत ही टीम आपला अहवाल सादर करणार आहे. ही टीम या विमान अपघाताला कारणीभूत आणि संभाव्य कारणांचा शोध घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे, पुढील काळात अशा प्रकारचा अपघात टाळण्यासाठी ही टीम काही शिफारशी देखील करणार आहे.

नेमके काय घडले ?

केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर एअर इंडियाचे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरुन घसरले. हा अपघात इतका भीषण होता कि, क्रॅश होताच या विमानाचे २ तुकडे झाले. या भीषण विमान दुर्घटनेत २ पायलटसह १८ जणांचा मृत्यू झाला तर १७० जणांना वाचवण्यात यश आले. एअर इंडियाचे विमान (IX-1344) मध्ये एकूण १९० जण होते. ज्यात १७४ प्रवासी, १०मुले, ४ केबिन क्रू आणि २ पायलट यांचा समावेश होता. दुबईवरुन येणारे विमान दरीत कोसळले आणि मोठा आवाज झाला. त्यानंतर, तात्काळ घटनास्थळी बचाव पथकाने बचावकार्याला सुरुवात केली. तसेच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑफिसात ५० टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना, राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी

News Desk

मुंबई, पुण्यातून बाहेर जाण्यास किंवा आत येण्यास परवानगी नाही

News Desk

महापालिकांना तसा सरसकट आदेश द्यावा, मनसेची सरकारकडे महत्त्वाची मागणी

News Desk