HW News Marathi
महाराष्ट्र

‘युरोप ट्रिपदरम्यान एक पेंटिंग पाहून घाबरला होता सुशांत’; चौकशीदरम्यान रियाचा नवा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. युरोप टूरवर असताना सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसले होते आणि त्यानंतरच सुशांत नैराश्यात गेला, असा धक्कादायक दावा सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने केला आहे. मुंबई पोलिसांना रियाने दिलेल्या जबाबातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये रिया, सुशांत आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोपला गेले होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे रियाने सांगितले..

“आम्ही इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील एका ६०० वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलमध्ये मी आणि शोविक एका रुममध्ये राहिलो होतो तर सुशांत वेगळ्या रुममध्ये राहिला होता. काही कामानिमित्त मी आणि शौविक हॉटेलमधून बाहेर गेलो होतो. काही तासांनी आम्ही दोघे हॉटेलमध्ये परत आलो, तेव्हा सुशांत हॉटेलच्या एका कोपऱ्यात बसून रुद्राक्ष माळेचा जप करत होतो. यावेळेस सुशांत खूप घाबरला होता. तो थरथर कापत होता. त्याला घाम फुटला होता. हे पाहून मी आणि शौविकने सुशांतला रुममध्ये नेले” असे रियाने सांगितले.

“आम्ही सुशांतला तुझी अशी अवस्था का झाली याबाबत विचारली. तेव्हा सुशांतने एक धक्कादायक घटना सांगितली. ज्या हॉटेलमध्ये आम्ही तिघे थांबलो होतो त्या हॉटेल मध्ये गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराचे पेंटिंग होते. ज्यात एक राक्षस एका मुलाला खातानाचे चित्र रेखाटले होते. ती पेंटिंग पाहून सुशांत खूप घाबरला होता आणि त्याला त्या पेंटिंगमधलं भूत दिसत होतं. तो त्याला बोलवत होता, असं सुशांतने आम्हाला सांगितलं. तो प्रचंड घाबरला होता. मी आणि शोविकने सुशांतला कसंबसं सांभाळलं. त्यानंतर आम्ही लगेच ते हॉटेल सोडले” अशी माहिती रियाने दिली.

“इटलीनंतर आम्ही तिघे ॲास्ट्रियाला गेलो. तिथे आम्ही बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी ४ दिवसांचे बुकिंग केले होते. मात्र आपल्याला भीती वाटत आहे, आपण परत मुंबईला जाऊ, असं वारंवार सुशांत मला सांगत होता. तो खूप घाबरलेला होता. आम्हाला काहीच सुचत नव्हते. सुशांतची तब्येत बिघडू लागली होती. आमची युरोप टूर २ नोव्हेंबर २०१९ ला संपणार होती, मात्र ती अर्धवट सोडून आम्ही २८ ऑक्टोबरलाच मुंबईला परत आलो.” असे रियाने सांगितले.

“सुशांत घरी गेल्यावरही सतत बेडरुममध्येच असायचा. अधूनमधून सुशांतच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज यायचे. हे काही दिवस असंच सुरु राहिलं. म्हणून आम्ही मानसोपचार तज्ञांकडे गेलो. पण सुशांतला बरं वाटतं नसल्याने आम्ही मानसोपचार तज्ञ बदलत राहिलो.” असा दावा रिया चक्रवर्तीने केला आहे.

“याच मुद्दायावरुन आमचे आणखी कडाक्याचे भांडण झाले आणि मी माझी बॅग घेऊन सुशांतच्या घरातून निघून गेले. या सगळ्यामुळे मलाही खूप नैराश्य आले होते. म्हणून मीदेखील एका मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला. ८जून ते १४ जून दरम्यान मी आणि सुशांत अजिबात संपर्कात नव्हतो. पण १० जूनला सुशांतने शोविकला एक मेसेज करुन माझ्या तब्येतीबद्दल विचारणा केली होती. 14 जूनला जी दुःखद बातमी आली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली,” असे रियाने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय नाविन्य निर्देशांक २०२१’ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर

Aprna

“आमच्यामध्ये थोडीशी नव्हे… तसूभरही चर्चा नाही”, खातेवाटप प्रश्नावर अजित पवारांचा टोला

News Desk