HW News Marathi
Covid-19

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आज नागपुरात देणार !

नागपूर | कोरोनाचा धोका हा केवळ लस आल्यावरच कायमचा जाऊ शकतो. अशातच स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला मोठे यश मिळत आहे. महाराष्ट्रात स्वदेशी कोरोना लसीच्य चाचणीला नागपुरात सुरुवात झाली आहे. भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आज (११ ऑगस्ट) नागपुरात देण्यात येत आहे. नागपुरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २७ जुलैला पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी ३ जणांना पहिला डोस देण्यात आला होता. त्यानंतर सात दिवसांत ५५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली.

गेल्या १४ दिवसात त्यांची प्रकृती उत्तम असून कोणताही दुष्परिणाण दिसून आलेला नाही. त्यांचा रक्ताचा अहवाल दिल्लीला सेंट्रल लॅबकडे पाठवण्यात आला आहे.आता त्यातील सात जणांना आज दुसरा डोस देण्यात येत आहे. देशात १२ केंद्रांवर या कोव्हॅक्सिनच्या या चाचण्या होत आहेत. लस दिल्यानंतर १४ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुक, ट्विटरवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?,” सेनेचा टोला

News Desk

मी पंढरपूरला जाणार, विठुरायाकडे कोरोनाचे संकट नष्ट करण्याचे साकडे घालणार | उद्धव ठाकरे

News Desk

HW Exclusive | विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो !

News Desk