HW News Marathi
Covid-19

तिरुपती बालाजी मंदिरातील ७४३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

तिरुपती | कोरोना रुग्णांची संख्या जगभरात वाढत आहेच शिवाय देशात देखील सातत्याने वाढत आहे. अशातच तिरुपती बालाजी मंदिरातील ७४३ कर्मचाऱ्यांसह पुजारी कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. ७४३ जणांपैकी ४०२ लोकं बरी झाली आहेत तर ३३८ लोकांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता आणि त्यामुळेच सर्व धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली होती. यातच बालाजी मंदिर देखील बंद ठेवण्यात आले होते. यानंतर ११ जूनला पुन्हा बालाजी मंदिर सुरू केले होते. मात्र, कर्मचारी आणि पुजारी यांना कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown3 : देशातील लॉकडाऊन २ आठवड्यांनी वाढवला

News Desk

मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

पुणे विभागातील 5 लाख 84 हजार 922 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 

News Desk