HW News Marathi
Covid-19

…म्हणून भाजप आमदार पवारांना भेटतात ! चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण

मुंबई । “आमचे कोणतेही आमदार तसेच नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात नाहीत. मतदारसंघात कामं होत नाहीयेत म्हणून भाजप आमदार शरद पवारांची भेट घेतात. आमचे आमदार पवारांची भेट घेतात म्हणजे ते राष्ट्रवादीत जाणार, असा अर्थ होत नाही”, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. “प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात चांगले काम करण्याची इच्छा असते. अशात आपल्या मतदारसंघात कामं व्हावीत म्हणून भेट घेतली तर चूक काय ?”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“अनेक जणांचे शरद पवारांशी जुने संबंध आहेत. त्याचप्रमाणे, मतदारसंघातील कामांसाठी भेटी होत असतात. मात्र, त्यामुळे बाकी ज्या चर्चा रंगतात त्यात कोणतंही तथ्य नाही”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी “भाजपच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केले नेते आणि आमदार आता पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत”, असा दावा केला आहे. त्यापूर्वी, राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगात होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना, भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर, चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

भाजप आमदार शिवेंद्रराजेंची पवारांच्या बैठकीला हजेरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी (९ ऑगस्ट) सातारच्या दौऱ्यावर होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात कराडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात एक बैठक झाली. यावेळी साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले पवारांच्या या आढावा बैठकीला गैरहजर राहिले होते मात्र भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी मात्र या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या। उदय सामंत

News Desk

“नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन बिनकामाचा, कडक लॉकडाऊनच हवा”, AIIMSचा इशारा

News Desk

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

News Desk