न्युझीलंड | जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. या विषानुशी २ हात करणे अनेक देशांना जमले नाही. मात्र, या संसर्गाला मात न्यूझीलंडने दिली आहे. गेल्या १०० दिवसांत न्यूझीलंडमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही आहे.
न्यूझीलंडमध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस सक्तीचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी १०० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आता गेल्या १०० दिवसांपासून स्थानिक पातळीवर एकही रुग्ण आढळला नाही. न्यूझीलंडमध्ये गेल्या ३ महिन्यांपासून खूप कमी कोरोनाबाधित आढळले होते. यामध्ये परदेशातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना ताबडतोब आयसोलेशन केंद्रामध्ये पाठवण्यात येत होते.
ओटागो विद्यापीठाचे महासाथ आजार तज्ञ प्रा. मायकल बेकर यांनी सांगितले की, चांगले राजकीय नेतृत्व आणि विज्ञान यांचा हा एकत्रित परिणाम आहे. ज्या देशांनी करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवले, त्या देशांमध्ये या गोष्टी एकत्रितपणे घडल्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे. लॉकडाउन दरम्यान त्यांनी करोनाबाबतची सर्व माहिती त्यांनी सातत्याने लोकांपर्यंत पोहचवली. लॉकडाउन सक्तीचे करताना त्यांनी करोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वास नागरिकांना दिला होता. करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंड सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली.
On Friday there were 133 people swabbed over a two-hour period at New World in New Plymouth. The testing centre in Manurewa had 153 people swabbed yesterday, and 326 people were tested yesterday at the pop-up clinic in Christchurch.
— Unite against COVID-19 (@covid19nz) August 9, 2020
अखेर कठोर निर्बंधानंतर कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यास यश मिळाले. न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मार्च महिन्यात इटली आणि स्पेनमध्ये वेगाने करोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्याचवेळी न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यावेळी फक्त सहा रुग्ण होते. त्यानंतर १९ मार्च रोजी न्यूझीलंडबाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली. लॉकडाउनच्या नियमांचे नागरिकांनीही पालन केले. एका मंत्र्याने लॉकडाउनचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत १५०० करोनाबाधित आढळले. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या संसर्गानंतर जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशांमध्ये क्रीड स्पर्धांचेही आयोजन होऊ लागले असून बार, रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू झाले आहेत. प्रा. मायकल बेकर यांनी सांगितले की, न्यूझीलंड सुरुवातीपासूनच कठोर निर्णय घेतले. सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. आपल्या देशाच्या सीमा सील केल्या आणि आरोग्य व्यवस्थेवर अधिकच भर दिला. त्यामुळे न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर फार कमी परिणाम झाला. न्यूझीलंडने बेरोजगारीचा दर ४ टक्के इतका ठेवण्यात यश मिळवले आहे.
COVID-19 Update
There are no new cases of COVID-19 to report in New Zealand today.
It has been 100 days since the last case of COVID-19 was acquired locally from an unknown source. We have 23 active cases of COVID-19 in managed isolation facilities.
— Unite against COVID-19 (@covid19nz) August 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.