HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंनी उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली – चंद्रकांत पाटील

कणकवली | भाजप नेते नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी स्वत:च्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांना कोकणात बोलावले, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नारायण राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली आहे. कारण अमित शाह अशी व्यक्ती आहेत की. जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

आज (७ फेब्रुवारी) नारायण राणे यांच्या कणकवली येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. नारायण राणे हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. आता त्यांनी कोकणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमित शाह यांना विनंती करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांना बाहेर आणण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार! – शरद पवार

News Desk

चक्क मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल!

News Desk

‘पुण्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल परत आंदोलन’, तत्कालीन मंत्री पंकजा मुंडेंच्या चौकशीची मागणी!

News Desk