HW News Marathi
Covid-19

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील तब्बल १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. त्यातच, आता नवनीत कौर राणा यांचा देखील कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता राणा यांच्या कुटुंबातील एकूण ११ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. चिंताजनक म्हणजे नवनीत – रवी राणा यांचा ४ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांच्या मुलीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. “माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा ,शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

https://www.facebook.com/1178465998965117/posts/2102676766544031/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

News Desk

पुण्यात मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू,अजित पवारांसह जिल्हातील आमदार,खासदारांची उपस्थिती

News Desk

कोविड-१९ संदर्भात राज्यात आतापर्यंत ७२ हजार गुन्हे दाखल

News Desk