HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यपालांना भेटून १२ आमदारांच्या नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल”, अजित पवारांचा संताप

पुणे | राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुकत्या गेल्या अनेक काळापासून रखडल्या आहेत. महाविकासआघाडी सरकारने १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती. मात्र, अजूनही त्यावर काहीही निर्णय झाला नाही आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. राज्यपालांना 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही १७१ आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले आहेत.

राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावं लागेल. किती काळ थांबायचं हे विचारलं पाहिजे. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळवेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक

Aprna

“मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस होती, पण आता काय हाल चाललेत तुम्हीच बघा”, पटोलेंचा पंकजा मुंडेंना टोला

News Desk

आमदार प्रताप सरनाईकांच्या शोधासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टवर ED-CBIची धाड

News Desk