मुंबई | राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात देखील पावसाचा जोर कायम आहे. याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे असे हवामान खात्याने कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (५ ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून पावसाचा आढावा घेतला. तसेच, पुढचे काही तास चिंताजनक असून काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर जा अन्यथा बाहेर जाऊ नका.
CM Uddhav Balasaheb Thackeray spoke to PM @narendramodi & apprised him of steps taken to safeguard citizens amidst torrential rain. He thanked the PM for offering support.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.