HW News Marathi
देश / विदेश

अहमदाबाद कोविड सेंटरमध्ये लागली आग, ८ रुग्णांचा मृत्यू

अहमदाबाद | गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोविड सेंटरला आज (६ ऑगस्ट) पहाटे आग लागल्याने ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरंगपुरा परिसराल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, काही रुग्णांना कोविड सेंटरमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे

कोविड-१९ सेंटरला आग लागल्याची माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सर्व रुग्णांना बाजूला असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर…

News Desk

भीषण स्फोटात इमारत जमीनदोस्त, सात ठार

News Desk

पत्नीने दुसऱ्यासोबत संबंध ठेवले, त्याने सासूसोबत केले झिंगाट

News Desk