HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बुलढाणा आणि औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबाद | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (५ फेब्रुवारी) बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापुर्वीच ते लोणार सरोवर येथे पोहोचले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराची पाहणी केली असून यावेळी वनकुटी येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सरोवरातील गायमुख या ठिकाणी पाहणी करीत सरोवराचे अवलोकन करण्यार आहे. मुख्यमंत्री २ तास लोणार सरोवर येथे थांबणार आहेत. त्यानंतर ते दुपारुन औरंगाबाद येथे राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरे दुपारी साधारण बारा वाजता औरंगाबादमध्ये पोहोचतील. चिखलठाणा येथे त्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल भूमिपुजन होणाक आहे. त्यानंतर ते दुपारी १२.३० वाजता औरंगाबाद शहर पाणीपुरवठा दिल्लीगेट जलकुंभ पाण्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर मुख्यमंत्री ठाकरे दुपारी १२.४५ वाजता जिल्हा नियोजन सभागृह येथे एक बैठक घेणार आहेत.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा इशारा देणाऱ्या मनसेच्या नेत्यांना स्थानबद्ध कऱण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ताब्यात घेतले आहे. या नेत्यांना क्रांती चौक पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे, संदीप कुलकर्णी यांच्यासब कार्यकर्ते स्थानबद्ध केले आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा संपेपर्यंत या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दराडे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि अनिल परबांची CBI चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचे थेट अमित शहांना पत्र

News Desk

बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार! – धनंजय मुंडे

News Desk

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढणार नाही! – संभाजीराजे

Aprna