HW News Marathi
देश / विदेश

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाच्या भव्या लालची नियुक्ती

अमेरिका | जगातील सुप्रसिद्ध ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राची सुत्रं भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेच्या हाती देण्यात आली आहेत. भारतीय वंशाच्या डॉ. भव्या लाल यांची ‘नासा’च्या प्रमुख कार्यवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी डॉ. भव्या लाल यांचं नाव निवडलं आहे. “भव्या लाल यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव आहे. भव्या लाल नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेच्या सदस्य देखील राहिल्या आहेत”, असं ‘नासा’नं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

जाणून घ्या भव्या लाल बद्दल…

भव्या लाल २००५ पासून २०२० पर्यंत इन्स्टिट्यूट फॉर डिफेंस अॅनालिसिस साइंस अँड टेक्नोलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या रिसर्च स्टाफच्या सदस्य म्हणू न त्यांनी काम पाहिलं आहे.STPI मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या C-STPS LLC च्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. या अगोदर, त्या केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राच्या संचालक होत्या. अमेरिकेच्या न्यूक्लियर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं आहे.

अंतराळ क्षेत्रात भव्या लाल यांचं योगदान मोठं आहे. आंतरराष्ट्रीय अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. भव्या शिक्षणाच्या बाबतीतही एक पाऊल पुढे आहे. अणु विज्ञानात त्यांच्याकडे बीएससी आणि एम एसस्सी आहे.

जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक प्रशासनातात त्या डॉक्टरेट आहे. त्या अणु अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरण ऑनर सोसायटीच्या सदस्य आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे आयएसआय !

News Desk

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

News Desk

#JamiaProtests : प्रियंका गांधींचे इंडिया गेटसमोर ठिय्या आंदोलन

News Desk