HW News Marathi
महाराष्ट्र

गृहमंत्र्यांनी वायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर केले भाष्य…

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या एका वेगळ्याच विषयाच्या चर्चेत असून औरंगाबाद दौऱ्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये अनिल देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याने या फोटोवरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असल्याने याकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

“मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन,” असं अनिल देशमुख यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटलं आहे.अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे यावरुन राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्विट करत राग व्यक्त केला आहे.

अनिल देशमुख यांच्या वायरल फोटोमध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्येही होता. सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर कलीम कुरेशी याची औरंगाबाद शहरात गुटखा किंग म्हणून ओळख आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरात भाजपला मोठा धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द

News Desk

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट

Aprna

“दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती” नितीन गडकरींना सांगितला ‘तो’ किस्सा

News Desk