मुंबई | देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात येतो. यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला असून, अनेक महत्त्वाच्या बाबी यातून दिसून आल्या आहेत. याच अहवालातील एका मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामण सादर करणार आहेत.
करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला होता. या काळात सर्वच ठप्प झाल्यानं अनेकाचे रोजगार गेले. तर हातावर पोट भरणाऱ्यांना पुन्हा घर गाठावं लागलं होतं. या काळात सरकारनं थेट आर्थिक मदत करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.
अखेर थेट आर्थिक स्वरूपात मदत न करण्याचं कारण आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे. त्यावरून रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. “कोरोनाच्या सुरुवातीला मजूरवर्ग उन्हातान्हात चालत जाताना, नोकरदार पगाराअभावी हलाखीत जगत असताना केंद्र सरकारने मदत दिली नाही. कारण तेव्हा दिलेली मदत वाया गेली असती, असं आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण वाचून मन सुन्न झालं. असा विचार करणं कितपत योग्य आहे?,” अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
During COVID outbreak,daily laborers were walking in heat,working classes were struggling to make ends meet without salary. As Central Govt. did not help,according to ES report,center’s aid would have been wasted.I was stunned to read the observations. How is this right thinking?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.