HW News Marathi
देश / विदेश

२०२१ चा केंद्रिय अर्थसंकल्प सादर करण्याआधी सरकारला ‘या’ बाबतीत मिळाला दिलासा!

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्याआधी सरकारला दिलासा देणारी एक माहिती समोर येत आहे. जानेवारीत जीएसटी कलेक्शनच्या रेकॉर्डमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. जानेवारीत जीएसटीचं एकूण कलेक्शन १.२० लाख कोटींवर पोहोचलं आहे. काल (३१ जानेवारी) वित्त मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ मधील जीएसटी कलेक्शन मागच्या वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढलं आहे. यावेळी अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ’३१ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जीएसटी कलेक्शन १,१९,८४७ कोटी रुपये होतं. यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) २१,९२३ कोटी रुपये, राज्ये जीएसटी (SGST) २९,०१४ कोटी, एकिकृत जीएसटी (IGST) रुपये ६०,२८२ कोटी आणि सेर ८,६२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इतकंच नाहीतर जीएसटी विक्री परतावा भरल्याची संख्या जास्त असल्यामुळे हा आकडा आणखी जास्त असू शकणार आहे.

जीएसटी कलेक्शन वाढीसंदर्भात सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कर घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात आली. यामुळे रिटर्न फाइलिंगमध्ये तेजी पाहायला मिळाली. नोव्हेंबर २०२० पासून आतापर्यंत २७४ लोकांना अटक करण्यात आली आहे, तर ८५०० बोगस कंपन्यांविरूद्ध २७०० गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे ८५८ कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

swarit

Gujarat Election Result Live Updates : दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान मोदी सायं. 6 वा. जाणार; कार्यकर्त्यांना संबोधित करणार

Aprna

सरकारने शेतकऱ्यांविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले, संजय राऊतांचा केंद्रावर हल्ला

News Desk