HW News Marathi
देश / विदेश

Gujarat Election Result Live Updates : दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान मोदी सायं. 6 वा. जाणार; कार्यकर्त्यांना संबोधित करणार

मुंबई। गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या दोन्ही राज्याच्या मतमोजणीला आज (८ डिसेंबर) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात कोणाची सत्ता येईल हे आज स्पष्ट होईल. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राउंड आहे. यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election Result) निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेश कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. यात पहिला टप्पा १ डिसेंबर आणि दुसरा टप्पा ५ डिसेंबरला मतदान झाले.  गुजरातमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी ९२ हा बहुमताचा अकडा आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये ६२ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. गुजरातमध्ये ६४.३३ टक्के मतदान झाले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये ७५ टक्के मतदान झाले आहे. एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्चित असलेल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले होते.

गुजरातमध्ये 2017 मधील विधानसभेचे निकाल

गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षापासून भाजपचे सरकार आहे. यातील 12 वर्ष पंतप्रधान मोदी हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले होते. गुजरातमध्ये २०१७ मध्ये भाजप ९९, काँग्रेस ७७, बीटी २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि अपक्ष ३ असा निकाल लागला होती. यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आपने पंजाबमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरली आहे. यामुळे गुजरात विधानसभा आपच्या किती उमेदवार निवडून येती, हे पाहाणे महत्त्वाचे आहे.

Live Updates

 

 

  • हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.
  • गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे.
  • गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात शुकशूकाट
  • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सीराजमधून विजयी झाले आहेत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 6 वाजता दिल्ली भाजपच्या कार्यलयात जाणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. 
  • हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस 32 जागावर आघाडीवर आहे.
  • गुजरातच्या अहमदाबादमध्ये 21 पैकी 20 जागावर भाजप आघाडीवर आहे. 
  • गुजरातमध्ये भाजप 152 जागांवर आघाडीवर आहे.
  •  गुजरातच्या सुंदरनगरमधील भाजपचा उमेदवार राकेश कुमार विजयी
  • हिमाचल प्रदेशमध्ये सुंदरनगरमधून राकेस कुमार यांचा विजय झाला
  • हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे खाते उघडले आहे.
  • गुजरातमध्ये भाजपला 54 टक्के मते मिळाली आहे.
  • गुजरातमध्ये आप 10 जागांवर आघाडीवर आहे
  • गुजरातमध्ये काँग्रेसला 27 टक्के मते मिळाली आहे
  • गुजरातमध्ये काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे
  • गुजरातमध्ये आपला 13 टक्के मते मिळाली आहे. 
  • गुजरातच्या कच्छमध्ये 6 पैकी 4 जागांवर भाजप आघाडीवर आहे
  • गुजराच्या काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे.
  • गुजरातच्या नवसारीमध्ये  4 पैकी 3 जागांवर भाजप आघाडीवर आहे
  • हिमाचल प्रदेशमध्ये 33 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे
  • गुजरातमध्ये भाजप 131 जागांवर आघाडीवर आहे.
  • गुजरातमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे.
  • गुजरातमध्ये आप 4 जागांवर आघाडीवर आहे
  • हिमाचल प्रदेशमध्ये भाजप 34 जागांवर आघाडीवर आहे
  • गुजरातच्या विरगाममधून हार्दिक पटेल आता आघाडीवर आहेत
  • गुजरातमध्ये 48 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे
  • बडगावमधून काँग्रेसचे उमेदवार जिग्नेश मेवाणी आघाडीवर आहेत.
  • गुजरातमध्ये भाजप 128 जागांवर आघाडीवर आहेत.
  • गुजरातमध्ये आप दोन जागांवर आघाडीवर आहे
  • विरगाममधून हार्दिक पटेल हे पिछाडीवर आहेत
  • गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे
  • गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर स्फोट, १८ हून अधिक जण जखमी

News Desk

गेल्या शतकातील कायद्यांनी राष्ट्रनिर्माण शक्य नाही, मोदींचं कृषी कायद्यावरुन अप्रत्यक्ष भाष्य 

News Desk

देशात कोरोनामुळे आतापर्यंत १६६ जणांचा बळी, तर ४७३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk