HW News Marathi
महाराष्ट्र

“शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी” वरुण सरदेसाईंचा ‘मावसभावाच्या काकां’नाच टोला

मुंबई | मनसेची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आज (२९ जानेवारी) पार पडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठकीला त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे उपस्थित होतेच, मात्र अमित यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सूनबाई मिताली ठाकरेही हजर राहिल्या होत्या. युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ठाकरे कुटुंबाच्या हजेरीवरुन निशाणा साधला आहे.

कोरोना लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवताना ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ हा नारा महाविकास आघाडी सरकारने दिला. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी उचलावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवायचं आहे. मात्र मनसेने याआधी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ यावरुन राजकीय टिप्पणी केली होती. अमित आणि मिताली हे नवविवाहित दाम्पत्यही मनसेच्या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.

वरुण सरदेसाईंचा राज ठाकरेंना टोला

मनसेने ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या शॅडो कॅबिनेटवरुनही वरुण सरदेसाईंनी डिवचलं. ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ असं म्हणत सरदेसाईंनी आपल्या ‘मावसभावाच्या काकां’नाच टोला हाणला आहे. यावरुन मनसे आणि शिवसेनेत पुन्हा वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार पुत्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी देवीचा दुग्धाभिषेक व महापूजा केली जातेय 

News Desk

“उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे”,अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

राष्ट्रीय कार्यकारणीत मला जे पद दिलं तो मी माझा सन्मान समजते, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk