HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरें पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही जाणार अयोध्येला…!

अहमदनगर | मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्येला जाणार आहेत. येत्या १ मार्च ते ९ मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. ते आज (२९ जानेवारी) अहमदनगरमध्ये बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. मात्र अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी केंद्रीय कृषीराज्यमंत्री कैलास चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विविध प्रश्न विचारले. राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मार्च ते ९ मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ४.३० वाजता ‘वर्षा’वर महत्वाची बैठक

News Desk

OBC Reservation: आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी

News Desk

चंद्रपूर जिल्हा पुर्णपणे कोरोनामुक्त, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका

News Desk