HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी, ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश वाशी न्यायालयाने दिले आहेत. राज ठाकरे यांनी जामीन घेतला नसल्यानं ६ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायाधीश बडे यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी २०१४मध्ये वाशी टोलनाफा फोडला होता. त्या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

२६ जानेवारी २०१४ला राज ठाकरे यांनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्यानंतर गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता. त्याबाबत ३० जानेवारी २०१४ ला वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. आज ते वॉरंट रद्द झालं आहे. मात्र 6 फेब्रुवारीला राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं आहे.

याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून आता वॉरंट जारी करण्यात आलं आहे. येत्या ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हजर राहणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पडळकरांना आमदारकी फक्त पवारांवर टीका करण्यासाठी दिली”, रोहित पवारांनी दिलं जशास तसं उत्तर

News Desk

भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का, दिग्गजांना त्यांच्या गावातील जागा राखण्यास अपयश

News Desk

मी कधी ठाकरेंचा फॅन नव्हतो, मात्र मुख्यमंत्र्यांचे आत्ताचे कार्य ह्रदयाला भिडणारे आहे – प्रशांत भूषण

News Desk