HW News Marathi
देश / विदेश

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन, महाराष्ट्राचे सुपुत्र श्रीकांत दातार यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव

मुंबई । हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन असलेल्या भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीकांत दातार यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी गौरवण्यात आले आहे. श्रीकांत दातार यांचा पद्मश्री पुरस्काराने करण्यात येत असलेला हा गौरव महाराष्ट्रासह संपूर्ण भारतीयांसाठी एक अत्यंत अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्राचे सुपुत्र श्रीकांत दातार यांची ऑक्टोबर महिन्यातच ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या ११ व्या डीनपदी निवड झाली आहे

श्रीकांत दातार हे गेल्या २५ वर्षांपासून हार्वर्ड विद्यापीठात सेवा देत आहेत. अभिमानास्पद बाब म्हणजे दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन म्हणून विराजमान होणारे सलग दुसरे भारतीय वंशाचे प्राध्यापक ठरले आहेत.

राज ठाकरेंनी व्यक्त केल्या होत्या भावना

श्रीकांत दातार यांच्याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या होत्या. “जगातील हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या डीन पदी श्री श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. १९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्या तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार!”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी दातार यांचे कौतुक केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीच्या चांदनी महल भागातील १३ मशिदीमध्ये राहणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ कोरोना पॉझिटिव्ही

News Desk

#NirbhayaCase : सत्यमेव जयते ! अखेर चारही आरोपी फासावर

swarit

काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत माजी राष्ट्रपतींना निमंत्रण नाही

News Desk