HW News Marathi
Covid-19

राज्यमंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये !

इंदापूर | इंदापूर तालुक्यात गेली काही दिवसांपासून कोरोनाचे संकट गंभीर बनले असून संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना होण्याची गरज आहे. मात्र, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे गर्दीत सूरपाट्या खेळून व स्वतःचे छायाचित्र असलेले पतंग उडवून सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करीत आहेत. राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात पोरकटपणाने वागून व स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (२८ जुलै) प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

“मंत्री पदावरील व्यक्तीने बेजबाबदारपणे न वागता कर्तव्याची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे आवश्यक असते. मात्र, जबाबदार पदावरील व्यक्तीने कोरोनाच्या संकट काळात सूरफाट्या खेळून व पतंग उडवत पोरकटपणे वागणे हे इंदापूर तालुक्याच्या संस्कृतीला धरून नाही.सतत काहीना स्टंटबाजी सवय असलेल्या इंदापूरच्या राज्यमंत्र्यांनी पोरकट वागणे व प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी बंद करून, जनतेला शासकीय पातळीवर मदत करून दिलासा देण्याचे काम करावे”, असे स्पष्ट मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून रुग्णांची संख्या १२५ च्या पुढे गेली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यमंत्री भरणे यांच्याकडून शासकीय पातळीवर तालुक्यात प्रभावी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. इंदापूर कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोविड सेंटर उभारणे, नागरिकांच्या ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंटकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कोविड रुग्णासाठी व्हेंटीलेटर व उपचाराची सुविधा इंदापूर येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. राज्यातील इतर मंत्री, लोकप्रतिनिधी दौरे काढून प्रभावी उपाययोजना करीत असताना इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यावर चक्रीवादळाचे सावट, पंतप्रधानांकडून संपूर्ण मदतीचे आश्वासन

News Desk

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचं पालकत्व राज्य सरकार स्विकारणार – मुख्यमंत्री

News Desk

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता वाढली,मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान !

News Desk