नवी दिल्ली | देशात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४७,७०४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच, ६५४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एकून बाधितांचा आकडा १४,८३,१५७ इतका झाला असून ४,९६,४९८ एक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ९,५२,७४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आत्तापर्यंत राज्यात ३३,४२५ जणांना मृत्यू झाला आहे.
The recovery rate among #COVID19 patients has increased to 64.23%. The recoveries/deaths ratio is 96.6%:3.4% now: Government of India https://t.co/ozAOv0Z1Eq pic.twitter.com/9pcyZ6rl7m
— ANI (@ANI) July 28, 2020
देशात नमूने तपासण्याची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. गेल्या २ दिवसांत १० लाखांपेक्षा जास्त नसूने तपासण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. २६ आणि २६ जुलैला दर दिवशी ५ लाखांपेक्षा जास्त नमून्यांची चाचणी करण्यात आली आहे. २७ जुलैला १,७३,३४,८८५ नमूने तापसण्यात आले आहेत.
The total number of #COVID19 samples tested up to 27th July is 1,73,34,885 including 5,28,082 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/97Wft8sew3
— ANI (@ANI) July 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.