HW News Marathi
महाराष्ट्र

सीरममध्ये लागलेल्या आगीत घातपाताची अशी कोणतीही शक्यता नाही – शरद पवार

कोल्हापूर | कोरोनावर लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काल (२१ जानेवारी) आग लागली होती. या दुर्घटनेत ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सीरम संस्थेत लागलेल्या आगीवरून संशयाचा धूर निर्माण झाला आहे. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घातपाताची अशी कोणतीही शक्यता नाही, असं ठाम मत व्यक्त केले आहे. शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. पत्रकारांशी बोलत असता सीरम संस्थेत आग लागली या मागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की,’आज आपण असे बोलणे योग्य नाही. सीरम संस्था आणि तिथे काम करणाऱ्या सर्व संशोधकांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ही घटना पूर्णपणे अपघात आहे’, असं पवार यांनी ठामपणे सांगितले.तसंच, ‘सीरम ही जगमान्य संस्था आहे. सीरम संस्थेनं कोरोनावर पर्याय शोधण्यात यश मिळवले आहे. सीरम संस्थेत आग लागली. ज्या ठिकाणी लस तयार होत आहे, त्या जागेपासून ५ किमी अंतरावर ही घटना घडली आहे’, असंही पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील 3,666 ग्रामपंचायतींसाठी

News Desk

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा! – नाना पटोले

Aprna

जाणून घ्या… ‘लॉकडाऊ’मध्ये रामदास आठवले नेमका कोणता पदार्थ बनवला

News Desk