HW News Marathi
महाराष्ट्र

गली गली मे शोर है… अर्णव गोस्वामी चोर है…! अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी “गली गली मे शोर है अर्णव गोस्वामी चोर है… अटक करा अटक करा अर्णव गोस्वामी याला अटक करा…”, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (२१ जानेवारी) अर्णब गोस्वामी याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीने अर्णव गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव जाहीर करावे यासाठी रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

“अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा”, अशी मागणी माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केली आहे. तर मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी “अर्णव गोस्वामी याला ही गोपनीय माहिती कुणी पुरवली याची माहिती उघड करावी” अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुजय विखेंनी विमानातून आणलेल्या बॉक्समध्ये काय होतं?

News Desk

…तर कॉंग्रेसला 40 जागाही टिकविता येणार नाही – चंद्रकांत पाटील

News Desk

ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारची त्रिसदस्यीय समिती

Gauri Tilekar