नवी दिल्ली । “मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर, जाहीर प्रशंसा आणि देवी भवानीची उपासना करत आलो आहे. मात्र, नियम आणि परंपरेनुसार शपथ घेताना कोणत्याही घोषणा देणे योग्य ठरत नाही. मी केवळ याच नियमाची सभासदांना आठवण करून दिली. मात्र, मी कोणत्याही प्रकारे अनादर केलेला नाही”, असे स्पष्टीकरण आज (२३जुलै) राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.
Always been a strong and vocal admirer of Chhatrapati Shivaji Maharaj and worshipper of Goddess Bhawani.
Reminded Members that as per conventional practice at the time of taking oath, no slogans are given.
No disrespect at all.
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) July 23, 2020
व्यंकय्या नायडू उदयनराजेंना काय म्हणाले ?
भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा दिल्यानंतर व्यंकय्या नायडू म्हणाले कि, “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत नाही तर माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतले जात नाही. सभागृहात अशा कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. तुम्ही नवीन सदस्य आहेत. त्यामुळे भविष्यात हे लक्षात ठेवावे.”
उदयनराजे काय म्हणाले ?
“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता. महाराजांचा कोणत्याही प्रकारे अवमान झालेला नाही. मात्र, यावरून जे राजकारण सुरु आहे त्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचे वर्तन चुकीचे नाही”, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.