HW News Marathi
महाराष्ट्र

ऑस्ट्रेलियाची घमेंड उतरवत टीम इंडियाचा थरारक विजय

ब्रिस्बेन | रिषभ पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने २-१ च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका २-० अशा फरकाने जिंकली. ३२८ धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.

हा कसोटी सामना असला तरी भारतीय संघ दुसऱ्या डावात वन डे सामन्याप्रमाणेच फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. परंतु युवा फलंदाज शुभमन गिलने 91 धावांची खेळी केली. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव सांभाळला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही २४ धावा करुन माघारी परतला. मग चेतेश्वर पुजाराने रिषभ पंतला हाताशी घेत संयमी फलंदाजी केली. ५६ धावा करुन तोही माघारी परतला. यानंतर रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं.

अॅडलेड कसोटीमधील पराभव ते मालिका विजय, भारताचा हा विजय निश्चितच थक्क करणारा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत भारताचा संपूर्ण संघ ३६ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला आणि संघाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. मेलबर्न कसोटीत भारताने दमदार कमबॅक केलं. त्यानंतरची सिडनी कसोटी भारताने ड्रॉ केली. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारतासाठी विजयापेक्षा कमी नव्हता.

मग अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकत होता. ३२८ धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने सुरुवातीला बचावात्मक खेळ केला. त्यामुळे भारता हा कसोटी सामना ड्रॉ करण्याच्या प्रयत्नात असल्याचंच चित्र होतं. परंतु शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे सामन्याचं चित्र पालटलं आणि हा सामना तीन विकेट्सनी जिंकला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिह्यात अंबाजोगाई नगरपालिकाचे प्रभारी नगर अध्यक्ष राजकिशोर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

लातूर ग्रामीण मतदारसंघ धीरज देशमुख यांच्यासाठी फिक्स केला, संभाजी निलंगेकरांचा खळबळजनक दावा

News Desk

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीन चिट

News Desk