HW News Marathi
Covid-19

पुण्यात ‘कोविड १९ रुग्ण सेवा केंद्र’ सुरू केले !

पुणे | पुण्यात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी जागाही लागत आहेत. त्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘कोविड १९ रुग्ण सेवा केंद्र’ सुरू केले आहे. तसेच, रुग्णांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि छोट्या घरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावतीने हिंजवडी येथे कोरोना पॉझिटीव्ह परंतु सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी केंद्र सुरू केले आहे.

वैद्यकीयआणि आवश्यक आधुनिक सुविधा असलेले १०४ बेडचे ‘कोविड १९ रुग्ण सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.रुग्णांची उत्तम प्रकारची राहण्याची, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

https://www.facebook.com/1380455935513531/posts/3277491205809985/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,अजित पवारांचा इशारा !

News Desk

पुण्याचे माजी महापौरही भोंगळ कारभाराचे बळी, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही करावी लागली वणवण

News Desk

“ओळखा पाहू कोण?” अमृता फडणवीसांची नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

News Desk