HW News Marathi
Covid-19

“ओळखा पाहू कोण?” अमृता फडणवीसांची नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

मुंबई । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच ठाकरे सरकारवर बोचऱ्या टीका करताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर, अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह आणि ठाकरे सरकारवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत ट्विट केले आहे की, “ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही” असे कोडे घालत अमृता यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वीही नुकताच अमृता फडणवीस यांनी लसीकरणाच्या मुद्द्यांवरून निशाणा साधला होता. “आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय ४५ वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे”, असे ट्विट अमृता यांनी काहीच दिवसांपूर्वी केले होते
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून अजिंक्य राहाणेंनी केले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे कौतुक

News Desk

महाराष्ट्राचा ॲाक्सिजन गुजरातला पळवण्याचा प्रयत्न ,कट आला उघडकीस !

News Desk

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राकडून ‘गरीब कल्याण रोजगार योजना’, २५ हजार मजुरांना मिळणार लाभ

News Desk