HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला निश्चितच जातील !

मुंबई | अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेची भूमिका काय असणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराजीनंतरही राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार का ? हा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. “उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी निश्चितच अयोध्येला जातील”, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आहे. अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन आवश्यक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिरासाठीच्या या संपूर्ण आंदोलनाचे शिल्पकार आहेत. आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अखेर आला आहे. अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम हा शासकीय आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी निश्चितच अयोध्येला जातील”, असे संजय राऊत यांनी अगदी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले कि, “सर्वोच्च न्यायालायने राम मंदिराबाबतचा निर्णय आल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. शरद पवारांचा देखील राम मंदिराला विरोध नाही. हे तीन वेगळ्या विचारधारांच्या पक्षांचे सरकार आहे. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर आमचे एकमत असलेच पाहिजे असे नाही. काही मुद्द्यांवर आमचे विचार भिन्न आहेत. मात्र, आम्ही सर्वच राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करत आहोत”, असेही संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हुकमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, दरेकरांचा राऊतांना टोला

News Desk

“कॉंग्रेस कोणीही संपवू शकत नाही” – धवलसिंह मोहिते पाटील

News Desk

शरद पवारांची भेट का घेतली? राऊतांनी दिलं उत्तर…

News Desk